Monday, September 14, 2009

"गुळाचा गणपति"



खान्याशिवाय
दुसरं कामच नाही केल,
लहानपण माय सारं हादळन्यातच गेलं..

हे खाय, ते खाय खाण्यात मिळे सुख,
पोट राये भरून तरी डोळ्यात राये भूख..

सरेझन झोपे तेव्हा मले मिळे मुभा,
मग लपून-छपून काढो मी लाड्वाचा डब्बा..

दिवाळीच्या टाइमाले माया बोनसच राये,
फराय करू-करू मले जेवण नई जाये..

गुळ-साखरेचे येता जाता मारो बक्के,
घरातले सारे मले कावले होते पक्के..

सारेजन चिड़वे मले याची वाटे खंत,
अंदरुन मले हैरान करे पोटातले जंत..

कैटबरी आवडे मले, पण खिश्यात नसे पायली(दमडी),
आता सारं घेऊ शकतो, पण तशी भुखच नाई रायली..

आता जे काही येते पुढ्यात ते आनंदान खातो,
तृप्त होउन भगवंताचे गुणगान गातो..

आता आई म्हणते,'गोड-धोड तू खात काउन नाई.?,
माया "गुयाचा गणपति" कुठं हरवला गं बाई ....,
कुठं हरवला गं बाई . . . . . . !
-आशीष घोम-

No comments:

Post a Comment